Achievements
सौ मीरा राऊत यांना इम्साचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते तर खासदार मा. धैर्यशील माने,मा. एकनाथ आंबोकरसो माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर,एम्साचे अध्यक्ष मा. गणेश नायकुडे, कार्याध्यक्ष मा. के डी पाटील सर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभोज येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शैक्षणिक संकुलातील कर्मवीर अध्यासन केंद्रात पुरस्काराचे वितरण झाले.
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल ईस्पूर्ली ता. करवीर या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मीरा बाळासाहेब राऊत यांना इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनच्या ( इम्सा) वतीने दिला जाणारा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा साठी जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षणसंस्था हे समाजपरिवर्तनाचे केंद्र मानले जाते तर शिक्षणसंस्थेचा प्रमुख हा समाजपरिवर्तनाचा पाईक मानला जातो. शाळेला विकासाच्या उंचीवर घेऊन जायचे असेल तर सर्वप्रथम मुख्याध्यापक हा उपक्रमशील, कल्पक बुद्धीमत्ता असलेला शिक्षक आणि पालक यांच्या मध्ये अचुक संवाद साधणारा आणि मुलांमध्ये शाळेविषयी आकर्षक निर्माण करणारा असणारा गरचेचे आहे.या सर्व गुणांची जोड सौ.मीरा राऊत मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये दिसून येते.
या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल सलग अकरा वर्षे शंभर टक्के लागला आहे.
शाळेय क्रीडा स्पर्धेत या शाळेने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे अनेक माजी विद्यार्थी आज विविध शासकीय पदावरती काम करत आहेत.तसेच गेली दोन वर्षे समाज कल्याण मार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये मोफत शिक्षण देण्याच काम ही शाळा करत आहेत.
आज या शाळेत सेमी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये जवळ जवळ नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ग्रामिण भागात अशा संस्थेची उभारणी करुन मुलांना शिक्षणाची सोय करुन देण्याच काम आदरणीय मीरा राऊत मॅडम आणि बाळासाहेब राऊत सर यांनी केले आहे. या सर्वांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.





